नवी दिल्ली | कोरोना लस निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचं उत्तर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलं आहे.
करोना लसीसाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतील की, दिल्लीप्रमाणे मोफत दिली जाणार आहे? असा प्रश्न हर्ष वर्धन यांना विचारण्यात आला. फक्त दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात कोरोना लस मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
प्रत्येक राज्यात ठराविक शहरांमध्ये ड्राय रन केलं जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयाचा दौरा करून ड्राय रनचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका. पोलिओ लसीकरणाच्या वेळीही वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, पण लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे, असं हर्षवर्धन म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
आपण आजन्म आमदार, खासदार असल्याच्या थाटात राहून चालत नाही- देवेंद्र फडणवीस
नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक ‘स्वीकारार्ह’ नेते; ‘मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेक्षणाचा दावा
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन
‘जमत नसेल तर…’; नवनीत राणा यांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र
खळबळजनक! मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल