Top News देश

राजकारणासाठी कोरोना लस व्यतिरिक्त अनेक व्यासपीठ, तिथं या दोन हात करु- अमित शहा

नवी दिल्ली | कोरोना लसीवरुन जे लोक राजकारण करत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की राजकारण करण्यासाठी दुसरे अनेक व्यासपीठ आहेत. तिथं या, दोन हात करु, असं म्हणत गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांना आव्हान दिलं आहे.

गुवाहाटी इथं केंद्रीय सशस्त्र पोलीस बल अर्थात सीआरपीएफचे जवान आणि त्यांच्या परिवारासाठी आयुष्यान भारत योजनेची सुरुवात केली. यावेळी अमित शहा बोलत होते.

लोकांच्या आरोग्याशी निगडीत गोष्टी आहेत. आपल्या शास्त्रज्ञांनी अपार कष्ट करुन लस बनवली आहे. त्यावर का राजकारण करत आहात?, असा सवाल अमित शाह यांनी विरोधकांना केला आहे.

दरम्यान, आम्ही सीएपीएफ मध्ये 50 हजार जवानांची भरती करणार आहोत. पाच वर्षात सीएपीएफमधून निवृत्त होणाऱ्या प्रत्येक जवानाच्या जागी भरती केली जाईल. त्यामुळे प्रत्येक जवान वर्षातील 100 दिवस आपल्या परिवारासोबत घालवू शकेल, असंही शहांनी यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

आरएसएसमध्ये महिलांचा सन्मान नाही, ही पुरुषवादी संघटना- राहुल गांधी

भाजपच्या हिंदुत्वाला शिवसेनेनं चांगला धडा शिकवला- सुशीलकुमार शिंदे

“केंद्र सरकारचे कान उपटून हातात द्यायला आज बाळासाहेब हवे होते”

सरकारने एल्गार परिषदेला अचानक परवानगी का दिली?- ब्राह्मण महासंघ

भाजपला धक्का! 11 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती धरलं धनुष्य

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या