बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गायब?; दिल्ली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल

नवी दिल्ली | संपूर्ण देश सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या संकटकाळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. यातच आता काँग्रेसने देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असून त्यांच्या गायब होण्याची तक्रार थेट दिल्लीतील पोलीस ठाण्यात केली आहे.

काँगेसच्या ‘नॅशनल स्टुड्येंट यूनियन ऑफ इंडिया’ने बुधवारी दिल्लीच्या पोलीस ठाण्यात अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. ‘एनएसयूआय’ चे राष्ट्रीय महासचिव नागेश करियप्पा यांनी अमित अनिलचंद्र शहा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस ठाण्यात देताना म्हटलंय की, संपूर्ण देश कोरोनाच्या महामारीने त्रस्त आहे आणि देशातील नागरिक या महामारीच्या संकटात अडकला आहे.  अशावेळी प्रस्थापित नेत्यांनी केवळ भारत सरकार किंवा भाजप सरकारलाच उत्तर देणे बंधनकारक नाही तर देशातील नागरिकांनाही उत्तर देणे कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशात काहीही झाले तरी त्याची जबाबदारी कोणताच नेता घेत नाही. आज कोरोनाच्या संकटकाळात देशाचे 2 सर्वोच्च जबाबदार नेतृत्व गायब आहेत. देशातील जनतेला त्यांनी निवडलेल्या लोकप्रतिनिधींची गरज आहे तेव्हा हे लोक गायब होतात, असा टोला ‘एनएसयूआय’चे राष्ट्रीय सचिव आणि मीडिया प्रभारी लोकेश चुगने यांनी लगावला.

दरम्यान, अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की, फक्त भाजपचे? असा सवाल नागेश करियप्पा यांनी उपस्थित केला. आम्ही कोरोना काळात लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल जाणतो. पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर अमित शहा बेपत्ता झाले आहेत, असंही करियप्पा यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या – 

“देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना ‘ती’ लस कशी दिली जाते”

“वकिलाला दररोज अडीच लाख रुपये; राज्य सरकार कोणाचे हित जपत आहे?”

खूशखबर! उद्या केंद्र सरकारतर्फे 19 हजार कोटी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

‘या’ रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका अधिक; CSIR च्या संशोधनातून खुलासा

”शिवसेना भवनातून करिना-कतरिनाला फोन केले जातात, पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More