बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

श्रीनगर | जम्मू काश्मीर संदर्भातील कलम 370 रद्द केल्यानंतर पहिल्यांदात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरला भेट दिली. अमित शहा काश्मीरमधील एका सभेला उपस्थित होते. यावेळी त्यांनी फक्त काश्मिरी जनतेशी बोलण्यास तयार असल्याच सांगितलं. ही सभा सोमवारी शेर-ए –काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात पार पडली. त्यावेळी त्यांनी काश्मिरी जनतेला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूख अब्दुल्ला यांनी शहांना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. यावर शहांनी उत्तर देत मी बुलेट प्रुफ काचेचं संरक्षण हटवून फक्त काश्मिरी नागरिक आणि युवकांशी बोलेन असा टोला अब्दुल्ला यांना लगावला आहे. काश्मीरमधून 370 कलम रद्द केल्यानंतरचा अमित शहांचा हा पहिलाच दौरा होता. ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?, असा सवाल अमित शहा यांनी काश्मिरी युवकांना विचारला आहे.

सभेत बोलताना नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉक्रॅटीक पार्टीवर हल्लाबोल केला. काश्मिरी नागरिकांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचा या पक्षांनी कधी निषेध नाही केला. परंतु आता दहशतवाद्यांनी परिस्थितीचा फायदा घ्यावा हे दिवस गेले आहेत. आता कोणीही नागरिकांचा जीव घेऊ शकत नाही, असे शहा यावेळी म्हणाले. जम्मू काश्मीरमधील शांतता टिकून राहील अशी ग्वाही शहांनी यावेळी बोलताना दिली. 370 कलम रद्द केल्यानंतर काश्मिरी लोकांचा रोजगार व जमीन हिरावून घेतली जाईल, अशा अफवा पसरवल्या गेल्या पण कोणत्याही गावातील एकाही ग्रामस्थाची जमीन बळकावल्याचे उदाहरण मला दाखवून द्या, असं आव्हान शहा यांनी यावेळी केले आहे.

काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा का बंद केली? संचारबंदी का लागू केली? असे प्रश्न अमित शहांना अनेकदा विचारण्यात आले होते. याबद्दलचं मौन त्यांनी यावेळी सोडलं. काश्मीरमधील परिस्थितीचा फायदा घेण्याची संधी विध्वंसक वृत्तींना मिळू नये आणि आपल्या मुलांना रस्तावर येऊन गोळ्यांचा सामना करावा लागू नये म्हणून हे पाऊल उचलाव लागल्याचं स्पष्टीकरण अमित शहांनी दिलं.

थोडक्यात बातम्या-

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

‘समीर वानखेडे 2 लोकांचे फोन टॅप करत आहे’, नवाब मलिकांच्या आरोपाने खळबळ

‘त्या’ लेटर बाॅम्बवर क्रांती रेडकरचं पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर, म्हणाली…

स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याने केली समीर वानखेडेंची पाठराखण, पाहा व्हिडीओ

“इतकी लाळ चाटेगिरी करण्यासाठी किती वसूली केली?”

‘हिंमत असेल तर त्यांनी दावा ठोकावा’, नवाब मलिकांचं समीर वानखेडेंना खुलं आव्हान

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More