नवी दिल्ली | जगभरात कोरोना हा विषय अतिशय गांभीर्याने घेतला जातोय. मात्र केंद्रिय आरोग्य राज्यमंत्र्यांनी कोरोना विषयावर पत्रकारांशी बोलताना अतिशय बेजबाबदारपणाचं विधान केलं आहे. फक्त 15 मिनिटे उन्हात उभा रहा उष्णतेमुळे कोरोना पळून जाईल, असं हास्यास्पद वक्तव्य त्यांनी केलं आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्वीनी कुमार चौबे यांनी कोरोनापासून मुक्त होण्यासाठी अजब सल्ला सांगितला आहे. त्यांच्या या सल्ल्यावर मात्र सोशल मीडियातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
सकाळी 11 दुपारी ते 2 दरम्यान जास्त उन असतं. या उन्हात 10 ते 15 मिनिटं शरीराला फायदा होईल. यातून व्हिटॅमन डी मिळेल. यातून कोरोना व्हायरस संपून जाईल, असं अश्वीनी कुमार चौबे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, भारतात 168 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात हा आकडा 49 वर पोहचला आहे. केंद्र शासन योग्य पावलं उचलत असताना केंद्रिय आरोग्य राज्यमंत्र्यांनी मात्र अजब तर्क लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
पंतप्रधानांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी जी काही गरज पडेल ती पुरविण्याचं वचन दिलंय- उद्धव ठाकरे
आपण जागतिक यु्द्ध लढत आहेत, घाबरून युद्ध जिकंलं जात नाही- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
सरकार कोरोनाशी लढण्यात व्यस्त; फडणवीस समर्थक राजकारण करण्यात!
रंजन गोगोई यांच्या शपथविधीदरम्यान काँग्रेसचा संसदेत राडा; लगावले ‘शेम शेम’चे नारे
राज ठाकरेंची महाराष्ट्र सैनिकांना साद; म्हणतात…
Comments are closed.