देश

पश्चिम बंगालमधे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना मारहाण

Loading...

कोलकाता : पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका टोळक्याने केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांना घेराव घातला आणि काळे झेंडे दाखवले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद च्या कार्यक्रमाला बाबुल सुप्रियो गेले असता हा प्रकार घडला. या कार्यक्रमात डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि जवळपास दीड तास सुप्रियो यांचा रस्ता अडवून ठेवला.

बाबुल सुप्रियो यांच्यासोबत धक्काबुक्कीही करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच राज्यपालही घटनास्थळी पोहोचले, पण त्यांचीही वाट अडवण्यात आली. नंतर राज्यपाल आणि बाबुल सुप्रियो एकाच गाडीतून बाहेर जाण्यास निघाले तेव्हा दोघांनाही विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. धक्कादायक म्हणजे यावेळी बाबुल सुप्रियो यांचे कपडेही फाटले आणि त्यांच्या केसांना धरुन ओढण्यात आलं. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बाबुल सुप्रियो सत्राला संबोधित करण्यासाठी आले होते.

Loading...

मी इथे राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. विद्यार्थ्यांच्या वर्तवणुकीमुळे आणि त्यांनी ज्या पद्धतीने मला घेराव घातला, त्यावर मी नाराज आहे. या परिसरात बाबुल सुप्रियो यांच्यावर बॉटल फेकण्यात आल्या आणि त्यांचा चष्माही तोडण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, घटनेच्या वेळी आलेल्या पोलिसांना विद्यापीठाच्या कुलगुरुंनी आत येण्यास मनाई केल्याचा आरोप आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या