बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अन् ‘या’ केंद्रीय मंत्र्याने थेट शरद पवारांना नाकारली भेट; काय आहे कारण?

नवी दिल्ली | लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर संपुर्ण देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. तसेच उत्तर प्रदेश राज्य आणि केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात हे प्रकरण चर्चेत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती.

लखीमपूर प्रकरण चांगलंच पेटत असताना आता केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी चक्क शरद पवार यांना भेट नाकारल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चांना उधाण आलं आहे. ही भेट नाकारण्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसलं तरी शरद पवारांनी लखीमपूर घटनेवरून केंद्र सरकारवर साधलेला निशाणा हे त्यामागचं कारण असल्याचं बोललं जात आहे.

मंगळवारी दुपारी पीयूष गोयल आणि शरद पवार यांची पुर्वनियोजित भेट होणार होती. पण अचानक मंत्र्यांनी भेट नाकारल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांनी लखीमपूरच्या घटनेची तुलना थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यातच आता गोयल यांनी पवारांची पुर्वनियोजीत भेट रद्द का केली? अशा चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे.

सरकार सत्तेचा गैरवापर करून दडपशाहीचा प्रयत्न करत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. तसेच याप्रकरणी शेतकऱ्यांचा आवाज दाबाल तर तो प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही, असा इशाराही त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला दिला होता. सध्या राजकीय वातावरणात या प्रकरणामुळे चांगलंच वादंग पेटलं असताना गोयल यांनी पवारांना भेट नाकारल्याने आणखी चर्चांना वेग आला आहे.

थोडक्यात बातम्या

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची आकडेवारी

“इंग्रजांना जसं भारतातून हाकलून लावलं आहे, तसं भाजपलाही हाकलून लावू”

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, वाचा आजची आकडेवारी

नारायण राणेंची महाविकास आघाडीवर कुरघोडी; वेंगुर्ला नगरपरिषदेवर फडकावला भाजपचा झेंडा!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More