बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

..अन् अपघातात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी भागवत कराड उतरले डाॅक्टरांच्या भूमिकेत

औरंगाबाद | नेत्यांमधील विविध रुप अनेकवेळा कार्यक्रमादरम्यान समोर येत असतात. आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री असलेले डॉ. भागवत कराड यांचंही राजकारणापलिकडचं एक रुप लोकांना पाहायला मिळालं आहे. रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे कराड यांचं हे रुप समोर आलं आहे.

कराड रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातून सुुभेदारी विश्रामगृहाकडे जात होते. त्या दरम्यान त्यांच्यासमोरच अचानक रस्त्यावर रिक्षा उलटली. डॉ.कराड लगेचच गाडीतून उतरून अपघात झालेल्या ठिकाणी गेले. त्या अपघातात दोन लहान मुलं जखमी झाले होते. यावेळी कराड डॉक्टरांच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

यावेळी डॉ.कराड यांनी स्वत:चा हातरुमाल काढला आणि त्या रुमालाच्या साहाय्याने लहान मुलांच्या ओठातून येणारा रक्तस्त्राव रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी स्वत: मुलांना इतर कुठे लागलं आहे का हे? तपासले. ते मुलांना रुग्णालयात सुद्धा घेऊन चालले होते. मात्र त्याचवेळी मुलांचे नातेवाईक आल्याने त्यांनी मुलांना नातेवाईकांकडे सोपवले.

त्यानंतर कराड यांनी नागरिकांना “वाहने सावकाश चालवा. रस्त्यावर अपघात झाल्यास जखमींना मदत करत जा” असं आवाहन केलं आहे. डॉ. कराड यांनी केलेल्या या कामानंतर सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. मोटीवेशनल स्पीकर असलेल्या योगिता भयाना यांनी फोटो शेअर करून ट्विट करत डॉ.कराड यांचं कौतुक केलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्राची धाकधूक वाढली, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा राज्यात शिरकाव

थलायवा रजनीकांत यांनी सोशल मीडियाद्वारे केली ‘ही’ महत्त्वाची घोषणा

“सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री है”

T-20 World Cup: भारताच्या पराभवानंतर विराटची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पाहा गेल्या 24 तासातील दिलासादायक आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More