बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी असतो तर कानाखालीच चढवली असती’; नारायण राणेंची जीभ घसरली

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. नारायण राणे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत आगमन होताच नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्धाला सुरूवात झाली होती. त्यानंतर आता महाड इथे पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. त्यावेळी त्यांची जीभ घसरल्याचं पहायला मिळालं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वातंत्र्यदिनी भाषण देताना काहीसे गडबडले होते. त्यावरून नारायण राणे यांनी बोलताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ‘बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.

देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही, अशी टीका देखील त्यांनी केलीय. तर राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.

दरम्यान, एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे त्यामुळे मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं देखील नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

बीएसएफ जवानाच्या बहिणीने बांधली अस्थिकलशाला बांधली राखी, फोटो पाहून तुम्हालाही येईल रडू!

“‘शेरशाह’ चित्रपट करून चूक केली, असं मला वाटू लागलं आहे”

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

ह्रदयद्रावक! बहिणीला साडी आणायला गेलेला भाऊ परत आलाच नाही…

‘ही तर ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता’; तुषार भोसले कडाडले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More