बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदींना आणि योगींना मुलं नाहीत ते काय कुणाला देऊन जातील”

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांवरून मोदी सरकारवर टीका होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही विरोधक त्यांच्यावर या मुद्यावरून टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री संजीव बलियान यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्या नेत्यांमागे कोणीही नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुलं नाहीत. त्यामुळे ते कोणाला काय देणार पण त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्याकडे बघावं.  खा-खा खाऊन तुमची पोट भरली आहेत, असं म्हणत संजीव बलियान यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांना भडकवलं जात आहे. त्यांच्या जमिनी हडप केल्या जाणार आहेत अशा अफवा पसरवल्या जात असून विरोधक शेतकऱ्यांना घाबरवण्याचं काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनीवर जे वाकड्या नजरेने पाहतील त्यांचे डोळे फोडू. आता शेतकऱ्यांनाही सर्व कट लक्षात आला असल्याचं बलियान म्हणाले.

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे गरीब कुटुंबातून आले आहेत. केंद्राच्या नव्या कृषी कायद्याने कॉन्ट्रॅक्ट शेतीतून शेतकऱ्याला अधिक लाभ भेटणार असल्याचंही बलियान यांनी म्हटलं आहेे. त्यासोबतच ज्यांचे हात रक्ताने माखलेले आहेत आज तेच लोकं शेतकऱ्यांमध्ये जाऊन आपलं बस्तान मांडण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही बलियान यांनी शेतकरी आंदोलनावर केली.

थोडक्यात बातम्या-

मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या मंत्र्याच्या मुलाला झाली कोरोनाची लागण

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळत नाही- पंकजा मुंडे

सावधान! पुणे जिल्ह्यात कोरोना पुन्हा पसरतोय हातपाय; पाहा सविस्तर आकडेवारी

“हिंदू परिचारिकांवर विश्वास नाही म्हणून मोदींनी ख्रिश्चन परिचारिकेकडून लस घेतली”

बाबो! खेळाडूने हवेत उडी घेत पकडला अफलातून कॅच, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More