पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या बाहेर RPI ने फडकवला झेंडा!

मुंबई । गेल्या महिन्याभर चर्चेत असलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागला. राजकारणात निकालाची जोरदार चर्चा सुरु आहे. कसब्यात महविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला चांगलाच धक्का दिला आहे.

कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Rahul Dhangekar) यांचा विजय झाला असून पिंपरी चिंचवड येथे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटेंचा पराभव केला.

राज्यात महाविकास आघाडीची चर्चा सुरु असताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) आठवले (Ramdas Athawale) गटाने नागालॅंड येथे बाजी मारली आहे. पोटनिवडणुकी बरोबरच आज नागालॅंडमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यावेळी आठवलेंच्या आरपीआय पक्षाने इतिहास रचला आहे.

Y. लिमा ओनेन चॅंग (Y. Lima Onen Chang) यांनी नागालँडमधून नोक्सेन जागा जिंकली असून इम्तीचोबा ( Imtichoba ) यांनी तुएनसांग सदर-II ( Tuensang Sadar-II seat ) ही जागा जिंकली आहे.

पहिल्यांदाच आरपीआय आठवले गटाने विधानसभेत प्रवेश केला आणि म्हणून रामदास आठवलेंचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.

थोडक्यात बातम्या-

Who is dhangekar?; धंगेकरांच्या विजयानंतर चंद्रकांत पाटलांचा व्हिडीओ तुफान व्हायरल

“भाजपची उलटी गिनती सुरू झालीये”

कसब्यातील भाजपच्या पराभवावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

पराभवानंतर हेमंत रासनेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसनं हिसकावला; कसब्यात रविंद्र धंगेकर विजयी