केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका, म्हणाले….
औरंगाबाद | औरंगाबाद शहरात गॅस पाईप लाईन कामाचं केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना राबवली आहे. त्यातच आता रावसाहेब दानवे यांनी दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका केली आहे.
एक महिला पंधरा वर्षे यादेशात पंतप्रधान होती. मात्र, महिलांचे दु:ख दूर केले नाही. फक्त चुल आणि मुल हेच महिलांच काम आहे, असं त्यांना वाटायचं, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी इंदिरा गांधींचं नाव न घेता केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि पहिल्या पाचच वर्षात महिलांच दु:ख दूर केलं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती सुमन उधळली आहेत.
घराघरातील चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दु:ख दूर करण्यासाठी 100 रूपयांमध्ये गॅस उपलब्ध करून दिला. येत्या काही वर्षांमध्ये घरोघरी पाइपलाइनद्वारे गॅस पोहोचेल, असं आश्वासन रावसाहेब दानवे यांनी दिलं आहे. आज औरंगाबादमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात घराघरात पाइनलाईनच्या माध्यमातून गॅस उपलब्ध करून देण्याचा शुभारंभ आज होत आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.
दरम्यान, औरंगाबाद शहरातील दोन लाख कुटूंबांना पाइनलाइनद्वारे गॅस पुरवठा योजनेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं. सदर गॅसपाइपलाईन ही 60 किलोमीटरच्या अंतरापर्यंत असणार आहे. यावेळी बोलताना रावसाहेब दानवे यांनी इंदिरा गांधींवर टीका केली आहे. यावर अदयाप काँग्रेसकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आलं नाही.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! राज्याच्या अनलाॅकविषयी नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम
थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांसाठी मोठी योजना, ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले….
“भारतीयांना सुरक्षित आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही, चार केंद्रीय मंत्र्यांना…”
“काही लोक दाऊदची धुणीभांडी करतायेत ती आधी बंद करायला लावा”
Devendra Fadnavis : “अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही”
Comments are closed.