बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेनेचा प्रमुख कोण?; रावसाहेब दानवे स्पष्टच बोलले

मुंबई | शिवसेना (Shivsena) कोणाची? गटनेता कोणाचा? व्हीप कोणता खरा? असे सगळे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून जनतेला पडत आहेत. यासंबधी सध्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. शिवसेनेने आक्रमक होत अनेक नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. 20 तारखेच्या  कोर्टाच्या सुनावनीत शिंदे गटाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.

यावर भाष्य करताना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागीदारी असं म्हणता येईल. 18 पैकी 12 खासदार शिंदेगटाकडे, 55 पैकी 40 आमदार शिंदेगटाकडे आहेत. गटनेता कोण? शिवसेना प्रमुख कोण? याच्यावर अजून दावा केला नाही, गटनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आहेत, असं वक्तव्य दानवे यांनी पत्रकारांशी बोलताना केलं आहे.

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकांबद्दल बोलताना दानवे म्हणाले, 2019 ला जी युती शिवसेनेन तोडली ती जनतेला अजिबात मान्य नव्हती. सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेनं भाजपची फसवणूक केली. मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काॅग्रेस (Congress) सोबत हातमिळवणी केली. 25 वर्ष आम्ही युतीत होतो. दोन्ही पक्षाची विचारसरणी एक होती. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेन शेवटच्याक्षणी दगा दिला, असंही पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले.

भाजपच्या(BJP) या फुटीशी काहीही संबध नव्हता. आम्ही फक्त त्यांना पाठींबा दिला आहे. तसेच आमदारांनी बंड नाही केलं तर उठाव केला आहे. 2019 ची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी युती आमदारांना-खासदारांना पसंत नव्हती. भाजप आमच सरकार पाडेलं असं ते नेहमी म्हणत होते. त्यांच्या गुणांमुळे हे सरकार पडणार होतं. आता त्यांचं सरकार पडलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

थोडक्यात बातम्या

मोठी बातमी! रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष

कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

शिवसेना आमचीच म्हणत एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी 1 ऑगस्टला

मुळशी धरण परिसरात जमिनीला भेगा, नागरिक भयभीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More