बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘औवेसींना त्यांच्या महिला….’; अफगाणिस्तानसोबत भारताची बरोबरी केल्याने केंद्रीय मंत्री संतापल्या

नवी दिल्ली | अफगाणिस्तानवर तालिबानने आक्रमण करून कब्जा मिळवल्यानंतर यावरून भारतात नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. तर एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनी अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी औवेसींना टोला लगावला आहे.

भारतामध्ये 9 मुलींपैकी एका मुलीचा मृत्यू हा पाच वर्षांची असताना होतो. हे एका अहवालातुन दिसुन आलं. अफगाणिस्तानामध्ये महिलांसोबत जे सुरू आहे त्याची चिंता इथल्या सरकारला वाटते. मात्र भारतात हे चित्र बघायला दिसत नाही, असं औवेसी म्हणाले होते.

औवेसींना त्यांच्या महिला आणि समाजाच्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानात पाठवणं योग्य आहे. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश ही दिले होते की, केवळ अफगाणिस्तानच्या नागरिकांनाच संरक्षण देणार नाही तर ज्या लोकांना भारतात येण्याची इच्छा आहे त्यांनासुद्धा भारतात आश्रय देण्यात येईल, असं करंदलाजे यांनी सांगितलं.

दरम्यान, तालिबानने रविवारी अफगाणिस्तान विजयी झाल्याच्या घोषणा दिल्या. तब्बल दोन दशकांनंतर तालिबानी राजवट अफगाणिस्तानमध्ये प्रास्थापित झाली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र अफगाणिस्तानमधील नागरिकांनी देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीबद्दलचा द्वेष वाढला, हे सर्व पक्षांना माहिती मात्र बोललो फक्त मी”

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 9 महत्त्वाचे मुद्दे; वाचा काय म्हणाले राज ठाकरे

मोठी बातमी! आमदार निलेश लंकेंवर महिला तहसीलदाराचे गंभीर आरोप

अमेरिकेची ‘ही’ महत्त्वाची माहिती तालिबान्यांच्या हाती, तालिबान देणार अमेरिकेला धक्का???

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 12 मजुरांचा मृत्यु 3 जण गंभीर जखमी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More