बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर दोन खाशील’; ऑक्सीजन न मिळाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीला केंद्रीय मंत्र्यांची धमकी

भोपाळ | मध्य प्रदेशातील केंद्रीय मंत्र्यांसमोर तक्रार केली, तेव्हा त्याला चक्क उघडपणे धमकीच देण्यात आली. ही धमी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली आहे.

मध्य प्रदेशातील दमोहच्या एका रुग्णालयाबाहेर एका व्यक्तीने मंत्री प्रल्हाद पटेल यांच्याकडे तक्रार केली, की ‘अम्ही एवढे हताश आहोत… आम्हाला ऑक्सीजन सिलेंडर मिळाले नाही… यावर प्रल्हाद पटेल यांनी त्या व्यक्तीला धमकीच  दिली.

जर असं बोलशील तर दोन खाशील, असं प्रल्हाद पटेल म्हणाले. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्रल्हाद पटेल यांनी केलेल्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. तसेच त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, याआधी जनकल्याण मंत्री गोपाल भार्गव यांनी एक वादग्रस्त वक्तव्या केलं होतं. कोरोनातून बरे झाल्यानंतरही अनेक रुग्ण घरी जाऊ इच्छित नाहीत. रुग्ण जास्त असल्याने ऑक्सिजन पुरवठ्यावरही त्याचा परिणाम होत आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. यावर रुग्णांना सांगा, घरी जा अन्यथा मेला तर आमची जबाबदारी नाही, असं गोपाल भार्गव म्हणाले होते.

 

 

थोडक्यात बातम्या- 

बंगळुरुचा विजयी चौकार, राजस्थानवर 10 विकेट्सने मिळवला विजय

धक्कादायक! बेड मिळाला नाही म्हणून झाडाखाली झोपले अन् पत्नीसमोर सोडला प्राण

आजपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची संपूर्ण नियमावली; वाचा एका क्लिकवर…

आरे भावा तुच जिंकलाय टॉस! टॉसदरम्यान गोंधळला विराट कोहली, पाहा व्हिडीओ

चिंता वाढली… महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More