बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोदींच्या मंत्र्याचा अजब कारभार! दार बंद करून केली अधिकाऱ्याला मारहाण

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रशासनावर घट्ट पकड असलेला राजकारणी असं म्हटलं जातं. त्यांच्या काळात प्रशासनाला अधिक लोकाभिमूख बनवण्याचा प्रयत्न देखील झाला. प्रशासन आणि सरकार ही लोकशाहीच्या हितासाठी काम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. यांच्यात समन्वय असणं हे सर्वांच्या गरजेचं असतं. अशात आता मोदी सरकारच्या एका केंद्रीय मंत्र्याचा कारभार सध्या प्रचंड गाजत आहे.

देशाचे जलशक्ती आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री विश्वेश्वर तुडू यांनी आसाममध्ये अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. तुडू यांच्यावर या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पण विश्वेश्वर तुडू यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

आसाममधील मयुरभंज जिल्ह्यातील बारीपाडा येथे ही घटना झाली आहे. जिल्हा नियोजन मंडळाचे उपसंचालक अश्विनी मलिक आणि सहाय्यक संचालक देबाशीष महापात्रा यांना सरकारी फाईली घेऊन भाजप कार्यालयात येण्यास सांगितले. पण आचारसंहिता लागू असल्यानं अधिकाऱ्यांनी फाईली आणल्या नाहीत, परिणामी मंत्री महोदयांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, सध्या हे प्रकरण प्रचंड गाजत आहे पण केंद्रीय मंत्री विश्वेश्वर तुडू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्याविरोधात राजकारण केलं जात असल्याचं तुडू म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“…म्हणून भाजपला दु:ख होतंय”, जयंत पाटलांचा खोचक टोला

“नाना पटोले मिस्टर नटवरलालच्या भूमिकेत, त्यांच्यामुळं सोनिया गांधी…”

“कोल्हे देशाची माफी मागा, अन्यथा…” तीन तरुणांनी जाहीर केली भूमिका

Gold Price: सोनं-चांदी ‘इतक्या’ रुपयांनी महाग, वाचा आजचे ताजे दर

‘…तोपर्यंत शाळा सुरु करण्यास मोठा धोका’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More