बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप मंत्र्याचा कारनामा; जिवंत सैनिकाला वाहिली श्रद्धांजली

बंगळुरू | गेल्या काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आलाय. या विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या नवनियुक्त मंत्र्यांसोबत भाजपची देशभरात जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. कर्नाटकमधील गडग जिल्हात जनआशीर्वाद यात्रेमध्ये काहीसा वेगळाच प्रकार पाहायला मिळाला आहे.

मोदी सरकारमधील नवीन केंद्रीय राज्यमंत्री ए नारायणस्वामी यांच्या यात्रेदरम्यान श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद जवानाऐवजी जिवंत सैनिकाच्या घरीच पोहोचले. जवानांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांनी घोषणा करताच कुटुंबियांना धक्का बसला.

सैनिकाच्या घरी श्रद्धांजली वाहण्यास उपस्थित राहिले, त्या सैनिकाचं रवी कुमार कुट्टीमणी असं नाव आहे. कुट्टीमणीसोबत मंत्र्यांनी व्हिडीओ काॅलद्वारे संवाद साधला. त्यानंतर आपली चूक लक्षात येताच नारायणस्वामींनी काढता पाय घेतला. स्थानिक नेत्यांच्या चुकीच्या माहितीमुळे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.

भाजप मंत्र्याच्या माहितीप्रमाणे नारायणस्वामी यांना वर्षभरापूर्वी पुण्यात जीव गमावलेल्या जवान बसवराज हिरेमठच्या घरी भेट द्यायची होती. त्यांना कुटूंबाची सांत्वनपर भेट घेऊन मदतीची घोषणा करायची होती पण, त्यांना रवीकुमार कुट्टीमणी यांच्या घरी नेण्यात आलं. या सर्व प्रकारामुळे त्यांनी बसवराज हिरेमठच्या घरी टाळलं.

 

थोडक्यात बातम्या – 

अफगाणिस्तान सोडून पळालेल्या अश्रफ घनींना तालिबानकडून खास ऑफर, घनी स्वीकारणार?

मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे, ते…- नाना पाटेकर

योगी सरकारची मोठी घोषणा; राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला देणार ‘हे’ नाव

पुढचे ‘इतके’ दिवस पावसाची दडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

पंजशीरचे वाघ तालिबानवर पडले भारी; 300 तालिबान्यांना केलं ठार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More