नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या मुलाविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
हिमाशू राठोड यांच्या तक्रारीवरुन प्रल्हाद पटेल यांच्या मुलगा प्रबल पटेल आणि पुतण्या मोनू पटेल यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रबल पटेलसह आणखी सात जणांना अटक केली आहे.
प्रबल पटेलला अटक केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. कायदा आपलं काम करेल. मला या प्रकरणावर काहीच स्पष्टीकरण देण्याची इच्छा नाही, असं प्रल्हाद पटेल यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, प्रल्हाद पटेल यांच्यावर केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आहे.
महत्वाच्या बातम्या
-श्रेयवादाच्या लढाईवरून अजित पवारांनी शिवसेना-भाजपला काढले चिमटे
-ड्रायव्हिंग लायसन्स काढणं झालं सोपं; गडकरींनी केला ‘हा’ नियम शिथील
-माझा वाघ कुठे आहे?; शहीद जवानाच्या आईने फोडला हंबरडा
-नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले…
-सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरबद्दल शोएब अख्तर म्हणतो…
Comments are closed.