बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जेव्हा रेल्वे 100 च्या स्पीडने असते तेव्हा केबिनमध्ये….; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी केला खास व्हिडीओ शेअर

नवी दिल्ली | रेल्वे म्हटलं की सर्वांना आठवतं ते लहानपणी मामाच्या गावाला जायचं रेल्वेचं गाणंं ऐकलेलं असतं. दुसरी म्हणजे मुंबईतील लोकल, मात्र काहींना रेल्वेबाबत अनेक प्रश्न पडलेले असतात. रेल्वे कोण चालवतं?, रेल्वेला स्टियरींग असते का?, त्यासोबतच इतक्या वेगाने चालत असलेली रेल्वे कशी नियंत्रणात येते.

याबाबतचा व्हिडीओ रेल्वेचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये रेल्वे जेव्हा 100 च्या गतीने असते तेव्हा केबिनमध्ये चालवत असताना दोन लोको पायलट सिग्नलबाबत आपापसात कॉर्डिनेशन करीत सिग्नलची माहिती एकमेकांना देत आहेत. व्हिडीओमधील रेल्वे ज्याद्वारे ऑक्सिजन पुरवला जात आहे आणि ग्रीन कॉरिडॉरद्वारे ऑक्सिजन वितरीत केला जात आहे.

दोन लोको पायलट रेल्वे चालवत असताना दिसत आहेत. रेल्वे 100 च्या गतीने धावत आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो दोन्ही लोकोपायलट लक्ष विचलीत न होता रेल्वे मॉनिटर करत आहेत. रेल्वे चालवणं किती जबाबदारीचं असतं हे यावरून आपल्या लक्षात येईल.

दरम्यान, देशात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवला जात आहे. कारण रेल्वे वाहतुकीमधून आपण मोठ्या प्रमाणात म्हणजे टनच्या टन ऑक्सिजन वाहून नेऊ शकतो. रेेल्वेने अनेक राज्यांना कोराना संकटाच्या काळात ऑक्सिजन पुरवला आहे.

 

थोडक्यात बातम्या-  

बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो लावला

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक, पालकमंत्र्यांनी केली घोषणा 

टिक-टॉकवर बंदी, पण कंपनी करतेय सर्व भारतीय नियमांचं पालन; टिकटॉकचा भारतात कमबॅक होणार

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचं सरकार येईल असा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता”

प्रत्येक महाविद्यालयात साजरा होणार शिवस्वराज्य दिन; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More