बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नारायण राणे म्हंटल्याप्रमाणं इतिहास घडेल अन् सरकार पडेल”

मुंबई | उद्या महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण होत आहेत. शिवसेनेने भाजपला डच्चू देत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. अशातच आता भाजप नेत्यांनी राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येईल, असा दावा करण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यात मार्चमध्ये भाजपचं सरकार येणार, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं. त्यावर प्रविण दरेकर यांनी देखील राणे यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. अशातच आता रामदास आठवले यांनी देखील राणेंच्या वक्तव्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आणि दलितांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही. त्यामुळे सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. नारायण राणे यांच्या म्हणण्याप्रमाणे काही तरी इतिहास घडेल आणि सरकार पडेल, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन घरी जावं, असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा, मात्र बाळासाहेब थोरातांचा वेगळाच सूर

“तेव्हा अजितदादा मला म्हणाले, अरे हरभजनदेखील मॅच जिंकून देतो”

“तो दिवस लांब नाही, राज्यात भाजपचं सरकार येणारच”

नव्या कोरोना व्हेरियंटची दहशत; यंत्रणांना दिले सज्ज राहण्याचे आदेश!

“नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल, पाच वर्ष होतील पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More