बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; वाचा सविस्तर…

भोपाळ | गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही.

यावर, सुमारे 40 मिनिटे रामनाम लिहिण्याची अजब शिक्षा मध्य प्रदेशात करण्यात येत आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना शिक्षा देण्यासाठी एका पोलीस उपनिरीक्षकाने नवीन शक्कल लढवली आहे. सतना जिल्ह्यातील कोलगवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी अनोखी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून कागदावर प्रभू श्रीरामांचे नाव लिहून घेत आहेत.

पोलिसांनी गेल्या काही दिवसांमध्ये नियम मोडणाऱ्या नागरिकांना पकडून 30 ते 40 मिनिटे त्याच्यांकडून रामाचे नाव लिहून घेण्याचा उपाय सुरू केला आहे. कोरोना कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी 20 चेक पॉईंट्स तयार करण्यात आले आहेत. ही शिक्षा देण्यासाठी जवळच्या नागरिकांनी त्यांना काही वह्यासुद्धा दिल्या आहे.

दरम्यान, यापूर्वी आम्ही नियम मोडल्याची शिक्षा म्हणून उठा बश्या काढायला सांगत किंवा तासभर बसून नंतर सोडून देत असत. मला वाटले की ते नुसते बसण्यापेक्षा त्याऐवजी भगवान रामाचे नाव लिहू शकतात. त्यामुळे आम्ही ही शिक्षा सुरू केली. आतापर्यंत कोणावरही या शिक्षेची जबरदस्ती केली नाही. हा उपाय कोणाच्याही धार्मिक श्रद्धेच्या विरोधात नाही, अशी प्रतिक्रिया उपनिरीक्षक संतोष सिंह यांनी दिली.

थोडक्यात बातम्या – 

“वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतकं मनावर घेतलं आहे की…”

सर्वात मोठी बातमी: कोरोनावरील लस घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही!

नवऱ्यानं केली नसबंदी, त्यानंतर पत्नी प्रेग्नंट राहिल्यानं छळ, तपासात धक्कादायक माहिती समोर

कोरोनामुळे पत्नीला आलं टेन्शन, पतीनं केलं असं काही की पोलिसांनी केली अटक

वातावरण बदलतंय, कोरोनासोबत डेंग्यूचाही धोका वाढतोय; अशी घ्या स्वत:ची काळजी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More