बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलकडून महिलांना अनोेखी भेट; पाहा व्हिडिओ

मुंबई | 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून गुगलने अनोख्या प्रकारे महिलांचा सन्मान केला आहे. गुगलने एक व्हिडिओ बनवून महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुगल डुडलच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवण्यात आला आहे.

आज विविध क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर असताना पाहायला मिळत आहेत. पुरुषांबरोबरीने महिलाही आता काम करत आहेत. अशाच विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांना कौतुकाची थाप म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्त्याने गुगलने डूडलद्वारे एक ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये महिलांच्या हातांवर लक्ष केंद्रित केलं असून कला, क्रीडा, मनोरंजन यासारख्या विविध क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या महिलांना सलाम केला आहे.

1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत 8 मार्च हा दिन महिला दिन म्हणून घोषित करण्यात आला होता. त्याचा हेतू असा की, समाजातील सर्व महिलांना समान अधिकार आणि त्यांचा सन्मान होणं गरजेचं असल्याने हा दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलं होतं.

गुगलने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओमध्ये लेखिका राजकारणी खेळाडू अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला दिसून येत आहेत. याच महिलांचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन हा दिवस योग्य असल्याचं लक्षात घेऊन गुगलने हा व्हिडिओ त्यांच्या सन्मानार्थ प्रसिद्ध केला आहे.

पाहा व्हिडिओ

थोडक्यात बातम्या

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला राज ठाकरेंची चिंता; पत्राद्वारे केली मास्क घालण्याची विनंती

ऑनलाईन सत्र सुरू असताना वकिलाचा कॅमेरा ऑन राहिला अन्…, पाहा व्हिडिओ

बारामतीच्या ‘त्या’ रिक्षाचालकाच्या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर!

‘कृषी कायदे मागे घेऊन सरकारने माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी’; दिल्लीत आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

पोलीस कर्मचाऱ्याच्या छळाला कंटाळुन पत्नीनंतर पतीनेही केली आत्महत्या!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More