बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेमेंट वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यानं लढवली अनोखी शक्कल, ऑफिसमध्येच केलं ‘हे’ काम

नवी दिल्ली | अनेक कर्मचारी कमी पगारामध्ये आपलं काम करत असतात. कमी पगारामध्ये घरखर्च भागवणं कर्मचाऱ्यांसाठी आव्हानात्मक बाब असते. आपलं पेमेंट वाढवण्यासाठी अनेक क्लृप्त्या कर्मचारी राबवत असतात. त्यातच आता एका कर्मचाऱ्याने अजब शक्कल लढवली आहे.

ऑफिसमध्ये चांगल्या प्रकारचं काम करूनही कमी पगार मिळत असल्याने कर्मचारी चक्क आपलं घरगुती सामान ऑफिसमध्ये घेऊन आला आहे. या कर्मचाऱ्यांकडे घरभाडे देण्याइतकेही पैसे नसल्यानं ऑफिसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्मचारी जिथे काम करत आहे तिथे स्लिपिंग बॅगमध्येचं झोपू लागला आहे. सिमोन या कर्मचाऱ्यानं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सिमोनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या आवश्यक वस्तू आणि गादी घेऊन क्युबिकलमध्ये शिफ्ट झाला.

दरम्यान, सदरील कर्मचाऱ्याने ऑफिसलाचं आपलं घर बनवलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांची चांगल काम करूनही योग्य मानधन मिळत नसल्याची तक्रार असते. कंपनीमध्ये कामाचा ताण जास्त असल्याने कामासंदर्भात कंपन्यांसाठी काही कायदे बंधनकारक आहेत. अनेक क्षेत्रांमध्ये स्पर्धाही वाढू लागली आहे. त्यातच पेमेंट वाढविण्यासाठी काही लोक वेगवेगळ्या प्रकारे युक्त्या लढवतात.

थोडक्यात बातम्या- 

कोरोनाविषयी अजित पवारांनी दिला ‘हा’ गंभीर इशारा, म्हणाले…

‘या नियुक्त्या तुमच्याच सरकारच्या काळातील…’; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

‘2024 पर्यंत अमेरिकेच्या बरोबरीने….’; नितीन गडकरींचं मोठा प्लॅन

धक्कादायक! चीननंतर आता ‘या’ ठिकाणी होतोय कोरोनाचा उद्रेक

शेतकऱ्यांसाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची आणखी एक मोठी घोषणा, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More