बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनोखं संशोधन! आसपास कोरोना रुग्ण असेल तर 15 मिनिटांत वाजणार अलार्म

लंडन | देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज 4 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा लाखाच्या खाली आला आहे. मात्र तरीही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशातच ब्रिटनमधील काही शास्त्रज्ञांनी अशा अनोख्या उपकरणाचा शोध लावला आहे. ज्याच्या साहाय्याने कोरोना रुग्णाचा फक्त पंधरा मिनिटात शोध घेणे शक्य होणार आहे.

एखाद्याला खोकला, ताप असेल तर कोरोना झाला की काय अशी भिती वाटत असते. काही रुग्णांमध्ये लक्षणं जाणवली नाही तरीही त्यांना कोरोनाचं निदान होतं. कोरोना टेस्ट करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट, अँटिजेन टेस्ट केली जाते. मात्र आता कोरोना टेस्ट करण्यासाठी अलार्म तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या आसपास कोरोना संसर्ग झालेला एखादा रुग्ण असेल तर हा अलार्म तुम्हाला धोक्याची घंटा देणार आहे.

या उपकरणाचे नाव ‘कोविड अलार्म’ असे ठेवण्यात आले आहे. एखाद्या खोलीत जर जास्त लोक जमले असतील तर त्यामध्ये जर कोणी संक्रमित रुग्ण असेल तर आपोआप हा अलार्म वाजणार आहे. त्यानंतर खोलीत असलेल्या प्रत्येकाची व्यक्तिगत चाचणी करून शोध घेतला जाणार आहे. या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फक्त कोरोना नव्हे तर इतर अनेक रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही अलार्म सिस्टम महत्वाची ठरू शकते.

दरम्यान, जर कोरोना ग्रस्त असेल तर त्या खोलीतील अलार्म वाजेल आणि पंधरा मिनिटातच ही गोष्ट समोर येईल खोलीचा आकार मोठा असेल तर मात्र ही गोष्ट समजण्यासाठी अर्धा तास लागेल. आगामी कालावधीमध्ये विमानातील केबिन, क्लास रूम, केअर सेन्टर्स, घर आणि कार्यालयांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ चित्रपट ‘या’ तारखेला येणार चाहत्यांच्या भेटीला

‘तू तर अंतर्वस्त्र घालायची विसरली’, बोल्ड लुकमुळे ‘ही’ अभिनेत्री होतेय ट्रोल

शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाल्या…

काय सांगता ! WTC फायनलच्या विजेत्या संघाला मिळणार, विराटच्या IPL मानधनापेक्षाही कमी पैसे

“चंद्रकांंत पाटलांची अवस्था ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी झालीय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More