नाशिक | नाशिकच्या नरहरी नगरमध्ये राहणारे सुनील बोराडे, सुशील बोरी आणि शंतनू क्षीरसागर या तीन युवकांनी तब्बल 5 महिन्यांच्या परिश्रमानंतर एक अनोखी स्पोर्टस कार बनवली आहे. त्यांनी या कारचं नाव ‘परिस’ असं ठेवलंय.
सुनील हा 12वीचा विद्यार्थी आहे, तर सुशील आणि शंतनू नुकतेच डिप्लोमा पास झालेले आहेत. सुनीलच्या घरची परिस्थिती गरीबीची आहे. सुनीलच्या मार्गदर्शनाखाली हे ‘परिस’ घडवण्याचे काम चालू झाले.
‘तब्बल 5 महिने अहोरात्र कष्ट करुन त्यांनी साकारली त्यांच्या स्वप्नातील कार’. या कारचे डिझाईन अजून भारतात आलेले नाही. टाकाऊतून टिकाऊचा वापर करुन ही कार बनवण्यात आली आहे.
दरम्यान, या कारसाठी त्यांना पाच लाख रुपये खर्च लागला आहे, मात्र ही कार बाजारात विकण्यासाठी घेवून गेल्यास या कारची किंमत कोटींच्या घरात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेसला मोठा धक्का; माजी मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश
-एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयाचा ‘यांना’ मोठा दणका!
-महात्मा गांधींच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या माथेफिरु पूजा पांडेला अटक
-नगर लोकसभा जागेचं गणित काही जुळेना! राष्ट्रवादीचा प्रबळ दावा, विखे पाटील बंड करणार?
–मोदींच्या ‘मन की बात’ला राहुल गांधी देणार टक्कर; घेऊन येणार ‘अपनी बात राहुल के साथ’