बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कौतुकास्पद! कोरोनायोद्ध्यांना गरम होऊ नये म्हणून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बनवलं अनोखं ‘कुल पीपीई किट’

पुणे| देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. अशातच दिवस रात्र मेहनत घेणारे कर्मचारी आपल्या अथक प्रयत्नातून लोकांचे प्राण वाचवत आहे. कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना पीपीई किट घालावे लागतात. हे किट घातल्यावर किटमधील व्यक्ती अक्षरशः घामाने भिजून जातो. याच पीपीई किटवर पुण्यातील एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने अनोखा उपाय शोधून काढला आहे.

निहाल सिंह आदर्श या पुण्यातील तरुणानं ‘कुल पीपीई किट’ तयार केलं आहे. हे पीपीई किट घालणार्‍या व्यक्तीला यात गर्मीचा कोणताही त्रास जाणवणार नाही उलट यातून थंड हवा मिळणार आहे. निहालने बनवलेली कोव्ह-टेक वेंटिलेशन सिस्टम ही पीपीई किटच्या आत बसवलेली आहे. ती सभोवतालची हवा फिल्टर करुन आतमध्ये ढकलते. जेणेकरुन आपण पंख्याखाली बसल्यासारखे वाटते.

‘पीपीई किट एकवेळच्या वापरानंतर बदलला तरी हा डिव्हाईस पुन्हा दुसर्‍या किटसाठी सतत वापरता येतो. या डिव्हाईसची किंमत जवळपास साडेचार हजार रूपये आहे आणि तो सहजपणे पीपीई किटमध्ये फिट करता येतो. हा डिव्हाईस केवळ 100 सेकंदाच्या आत वापरकर्त्याला ताजी हवा देतो, असं निहालनं म्हटलं.

दरम्यान, निहालनं हा किट त्याची आई डॉ. पूनम कौर आदर्श यांना दिलासा देण्यासाठी बनवला होता, जी आदर्श क्लिनिक, पुणेमध्ये कोविड -19 रूग्णांचा उपचार करत आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“प्रियांका, कंगणाला भेटणाऱ्या मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान”

पुणे हादरलं! फुरसुंगीत कॅनॉलमध्ये एकामागोमाग एक मृतदेह आले वाहत

“बाबा माझे कपडे फाटलेत…”,बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी दीड वर्षांनंतर परिवाराला भेटली

“भाजपने ॲापरेशन लोटसचा कधीच दावा केला नाही, तरी एवढी धास्ती का?”

12 नावांची यादी खरंच भूतांनी पळवली?, राज्यपाल कार्यालयाचं तात्काळ स्पष्टीकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More