बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युनिव्हर्सल बाॅस ‘ख्रिस गेल’ने समुद्रात मारल्या पुश-अप, व्हिडीओ तुफान व्हायरल; पाहा व्हिडीओ

मालदीव | क्रिकेटच्या मैदानात स्टेडियमचे पत्रे फोडणारा ‘युनिव्हर्सल बाॅस’ ख्रिस गेल यंदा आयपीएल रद्द झाल्यानं मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं आयपीएल रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर डेव्हिड वाॅर्नर, स्टीवन स्मिथ आणि वेस्ट इंडिजचे काही खेळाडू मालदीवमध्ये राहायला गेले. त्यानंतर आता ख्रिस गेलचा मस्ती करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कॅरिबियन क्रिकेटपटू ख्रिस गेलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘स्कूबा डायव्हिंग इन द मालदीव’ असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. त्या व्हिडीओमध्ये तो हिंदी महासागरात उडी टाकताना दिसत आहे. त्यात त्यानं युनिव्हर्सल बाॅस असं झळकतं टायटल टाकलं आहे. तर तो समुद्रातील माश्यांसोबत मस्ती देखील करत आहे. त्यात त्याने 11 पुश-अप मारले.

व्हिडीओमध्ये ख्रिस गेल ‘ओ मामा आणि कोको लोको रिमिक्स’ या त्यांच्या आवडत्या गाण्यावर नाचताना दिसत आहे. कॅरिबियन खेळाडूंचा डान्स आयपीएलमध्ये प्रसिद्ध आहे. ख्रिस गेलनं देखील त्याच्या अंदाजातील डान्स त्यानं करून दाखवला आहे. तर त्याचबरोबर शेवटी त्यानं पंजाब किंग्जचा कर्णधार के एल राहूलने शिकवलेला नमस्कार देखील करून दाखवला.

दरम्यान, आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं यंदाची आयपीएल रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला होता. त्यानंतर परदेशी खेळाडू अडचणीत सापडले होते. कोरोनामुळे त्यांना त्याच्या स्वदेशी जाण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. त्यानंतर काही ऑस्ट्रेलियन आणि कॅरेबियन खेळाडूंनी मालदीवमध्ये मुक्काम ठोकला होता.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by KingGayle 👑 (@chrisgayle333)

थोडक्यात बातम्या-

भाजपच्या उत्तर प्रदेशातील ‘या’ तिसऱ्या मंत्र्याचं कोरोनाने दुर्दैवी निधन

“रडू नको बाळा आम्ही आहे ना इथं”, खचलेल्या तरुणाला निलेश लंके यांचा धीर

“मी छोटा राजनची पुतणी आहे, जीव प्यारा असेल तर 50 लाख रुपये दे”; पुणे पोलिसांची ‘ही’ कारवाई

महाराष्ट्रातील ‘हे’ शहर कोरोनामुक्तीच्या वाटेवर; रूग्णसंख्येत लक्षणीय घट

आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरात लसीचा दुसरा डोस घेतलाच कसा?; राजेश टोपेंनी सोडलं मौन, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More