विद्यापीठ चौक-गणेशखिंड वाहतूक कोंडी सुटणार! ‘इतक्या’ रुपयांचा निधी मंजूर

Pune traffic News

Pune News l पुणे विद्यापीठ चौकातील (Pune University Chowk) वाहतूक कोंडी येत्या काळात इतिहासजमा होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) वतीने येत्या ५० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून, या चौकात मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूल (Integrated Double Decker Flyover) बांधण्यात येत आहे. या उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी आवश्यक असणारी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या (Progressive Education Society) मॉडर्न लॉ कॉलेज (Modern Law College) समोरील जागा देखील ताब्यात घेण्यात आली असून, त्यासाठी ५२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शनिवारी (दि. २४) झालेल्या एका कार्यक्रमात, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्यामकांत देशमुख (Shyamakant Deshmukh) यांना निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. तसेच, निवेदिता एकबोटे (Nivedita Ekbote) यांच्या उपस्थितीत जागेचे हस्तांतर पत्र स्वीकारण्यात आले. यावेळी, पीएमआरडीएचे (PMRDA) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (Dr. Yogesh Mhase), मुख्य अभियंता रिनाज पठाण (Rinaz Pathan) उपस्थित होते.

वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना :

पुणे विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road) वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीए आणि महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने संयुक्तपणे विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून, विद्यापीठ चौकात मेट्रोसह एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वेगाने प्रगतीपथावर आहे. या उड्डाणपूलामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल (Modern High School) आवारातील रस्ता रुंदीकरणासाठी यापूर्वीच जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, पाषाण रस्त्यावरील (Pashan Road) मॉडर्न लॉ कॉलेज समोरील रस्ता रुंदीकरणासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. ही बाब लक्षात घेऊन, पीएमआरडीएने (PMRDA) पाठपुरावा करून, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीकडून महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यानुसार त्यांच्या मॉडर्न लॉ कॉलेज समोरील (मौजे औंध, सव्र्हे नंबर ८५/८६, सिटीएस नंबर १४४८) जागा ताब्यात घेतली आहे.

Pune News l बॉटनिकल गार्डन, कॅन्टीन इतरत्र हलवणार :

“येत्या ५० वर्षांच्या वाहतुकीचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे,” असे डॉ. योगेश म्हसे यांनी याप्रसंगी सांगितले. याशिवाय, मॉडर्न लॉ कॉलेज परिसरातील बाधित होत असलेले बॉटनिकल गार्डन (Botanical Garden), कॅन्टीन व इतर बाबींचे स्थलांतर करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीला प्राधिकरणाच्या वतीने ५२ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

सोमवारपासून (दि. २७) रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोसह एकात्मिक उड्डाणपूलाच्या पाषाण बाजूकडील रॅम्पचे काम सुरू करणे शक्य होणार आहे. यामुळे, विद्यापीठ चौक आणि गणेशखिंड परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

News Title : University-Chowk-Ganeshkhind-Traffic-Congestion-To-Be-Resolved-Fund-Of-Rs-52-Lakh-Sanctioned

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .