ठाणे महाराष्ट्र

भिवंडीतील शिवसेना शाखा प्रमुखावर अज्ञातांकडून गोळीबार!

भिवंडी | ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात असलेले काल्हेरचे शिवसेना शाखा प्रमुखावर मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केल्याची खळबळजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.

या घटनेत शाखाप्रमुख व त्यांची पत्नी या हल्ल्यात बचावले असून राजकीय वादातून हा गोळीबार झाला असल्याचं बोललं जात आहे. दिपक म्हात्रे असं गोळीबारात बचावलेल्या शिवसेना शाखा प्रमुखाचं नाव असून हा प्रकार त्याच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

याप्रकरणी दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत दोघा अज्ञात हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

थोडक्यात बातम्या-

कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर नरेंद्र मोदी म्हणाले…’देश आत्मनिर्भर होतोय’

“नाणारच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देणार, जमीन खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार रद्द करणार”

‘कष्टाचं चीज झालं’; कोविशिल्डला मिळालेल्या परवानगीनंतर अदर पुनावाला यांनी व्यक्त केला आनंद

“राज्य सरकारने उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणं बंद केलं पाहिजे”

काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या