बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंगळावर अज्ञात हेलिकॉप्टरचा वावर? नासाच्या रोव्हरने पात्यांचा आवाज केला कैद, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | नासाने मंगळावर पाठविलेल्या यानाने अज्ञात हेलिकॉप्टर उड्डाणासारखा आवाज रेकॉर्ड केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कमी उंचीवरून एखादे हेलिकॉप्टर जसं उडत जातं आणि त्याच्या पात्यांचा आवाज जसा येतो तसा हा आवाज आहे.

नासाच्या सहा चाकी रोव्हरमध्ये रेकाॅर्ड झालेल्या फुटेजमध्ये याबाबतची फुटेज रेकाॅर्ड झाली आहेत. ज्यामध्ये 30 एप्रिलला रोव्हरने हा आवाज रेकाॅर्ड केला होता. याबाबतचा एक व्हिडीओ नासाने त्यांच्या ट्विटर आकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ तीन मिनटांचा असून यामध्ये दबक्या आवाजात हेलिकाॅप्टरच्या ब्लेड्ससारखा आवाज येत आहे.

जेझेरो क्रेटरवर बेल्ड फिरल्याने वाऱ्याचा आवाज होत असून ही ब्लेड 2,400 rpm या वेगाने फिरत आहेत. तसेच या आवाजाची उंची 872 फूटांवर आहे. आता हा खराच हेलिकॉ़प्टर किंवा अन्य कोणत्या यानाचा आवाज आहे की वाऱ्याचा याबाबत मिशन सांभाळणारेही साशंक आहेत.

दरम्यान, प्लॅनेटरी सायन्सचे प्राध्यपक डेव्हीड मिमोउन यांनी म्हटल्याप्रमाणे मंगळा ग्रहावर असा आवाज येणं म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारचा सुखद धक्का आहे. तसेच रोव्हर या यंत्रामध्ये असे सेन्सर आहेत जे रोव्हरसमोरील दगडांचा अभ्यास करतात. यामध्ये कॅमेरा आणि उच्च प्रकारचा मायक्रोफोन आहे. याच मायक्रोफोनमध्ये हा आवाज टिपण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

मी काही उत्कृष्ट काम करत नाही, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला – नितीन गडकरी

गायत्री मंत्राने कोरोना पळवणार?; मोदी सरकारचा नवा प्रयोग

“सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता गोमूत्र प्या, तुम्हाला कोरोना होणार नाही”

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन; फक्त या सेवा सुरू राहतील

“नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More