“जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत….”; भाजप खासदाराचा गंभीर इशारा
लखनऊ | राज्यातील भोंगे काढण्याच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलेली पहायला मिळाली. यावरुन मनसैनिकांचाही कमालीचा आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. आता लवकर राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्यांच्या अयोध्या दौऱ्याकडे लागलं आहे.
राज ठाकरेंच्या अयोध्ये दौऱ्याआधीच उत्तर प्रदेशचे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत प्रवेश करु देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे दौरा सुरु होण्याआधी राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे.
अयोध्येत येण्यापूर्वी हात जोडून उत्तर भारतीयांची माफी मागावी, असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना भेटू नका, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काय काय पहायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी ! तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा रुग्णालयात दाखल
‘कायदा हातात घेण्याचे धाडस केल्यास…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना गंभीर इशारा
Gold Rate: सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा एका क्लिकवर
मोठी बातमी! आणखी एक सरकारी कंपनी विकण्याचा मोदी सरकारचा निर्णय
“मशिदींवरील भोंगे काढायला सांगितले म्हणून हिरव्या उचक्या लागल्या”
Comments are closed.