Jio चा ग्राहकांना आणखी एक दणका?, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लॅन होणार बंद?

Unlimited calling and data plan | मागच्या महिन्यात रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलकॉम कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केली. तसेच, मोबाइल रीचार्ज प्लॅन देखील वाढवण्यात आले. यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आपले सीमकार्ड बीएसएनएल या सरकारी टेलकॉम कंपनीमध्ये पोर्ट करू घेतले. अशात ग्राहकांना अजून एक मोठा दणका देणारी बातमी समोर आली आहे(Unlimited calling and data plan)

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने जुने केवळ वॉईस कॉलिंग आणि एसएमएस पॅक पुन्हा लॉन्च करण्याच्या संदर्भात सूचना मागवल्या होत्या. त्यावर आता जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाने ट्राय समोर आपलं म्हणणं मांडलं आहे.

अनलिमिटेड कॉलिंग, डेटा प्लॅन होणार बंद?

गेल्या काही दिवसांपासून वापरकर्त्यांना अशी भीती वाटते आहे की, त्यांचे आवडते अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा टेलीकॉम पॅकेज बंद होतील. अशात दूरसंचार कंपन्या Jio, Airtel आणि Vodafone यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ला त्यांच्या अमर्यादित डेटा आणि कॉलिंग प्लॅनमधील संभाव्य बदलांबद्दल उत्तर दिले आहे. कंपन्यांनी आमचे रिचार्ज प्लॅन अशा प्रकारे तयार करण्यात आले आहेत की वेगळा प्लान खरेदी करण्याची गरज नाही, असं म्हटलं आहे.

या दूरसंचार कंपन्यांनी म्हटलंय की, आमचे टॅरिफ प्लॅन अशा प्रकारे डिझाइन केले आहेत की सर्व युजर्सना समान सुविधा पुरवल्या जातील आणि त्यांना कोणताही वेगळा प्लॅन खरेदी करण्याची गरज नाही. एअरटेल, जिओ यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे.(Unlimited calling and data plan)

Jio, Airtel आणि Vodafone ने काय म्हटलं?

एअरटेलने ट्रायला सांगितले की, “सध्या उपलब्ध असलेल्या योजना अगदी सोप्या आणि समजण्यासारख्या आहेत. व्हॉइस, डेटा आणि एसएमएस पॅकेजेसमुळे युजर्सचा अनुभवही खूप चांगला आहे. या रिचार्जचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते छुपे शुल्कासह येत नाहीत. म्हणजेच या रिचार्जमध्ये त्यांना कोणते फायदे मिळणार आहेत हे युजर्सना आधीच माहीत आहे.”

दूरसंचार कंपन्यांनी म्हटले आहे की, डेटा हा आजकाल दूरसंचार सेवांचा सर्वात महत्त्वाचा भाग बनला आहे, ज्यामुळे अमर्यादित डेटा आणि कॉलिंग मॉडेल पे-एज-यू-गो मॉडेलपेक्षा चांगले बनले आहे. या प्लॅनमधील कोणतेही बदल सध्याच्या वापरकर्त्याना आवडणार नाहीत. याबाबत ट्रायकडून सर्वेक्षणही करण्यात आले आहे. मात्र, ट्रायकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.(Unlimited calling and data plan)

News Title –  Unlimited calling and data plan may be discontinued

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांना आज यलो अलर्ट

महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सोन्याचा दिलासा?, जाणून घ्या 10 ग्रॅमचा भाव

देशात झपाट्याने पसरतोय मंकीपॉक्स, ‘या’ 6 पद्धतीने करा स्वत:चं संरक्षण

‘या’ 4 राशींना आज मोठा आर्थिक फटका बसणार, बोलण्यावर ताबा ठेवा!

नताशाने ‘एक्स’ बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप का केला? बॉयफ्रेंडने सांगितलं यामागचं कारण