बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा पूर्णपणे अनलॉक; चित्रपटगृह, मॉल्स यांसह सर्व आस्थापना होणार सुरू

औरंगाबाद | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हळूहळू नागरिकांना लॉकडाऊनमधून शिथीलता देण्यात येत आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अनलॉकला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्हे पूर्णपणे उघडले आहेत. परंतु, काही जिल्हे अजूनही निर्बंधाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने आता सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व नियम शिथिल करण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार 21 जूनपासून औरंगाबाद जिल्ह्यातील मॉल्स, चित्रपटगृह, सलून, जिम तसेच इतर समारंभ हे 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनातर्फे निर्बंधांमधून सुट दिल्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून औरंगाबादमधील रुग्णसंख्या वाढत होती. पण आता रुग्णसंख्या कमी झाल्याने प्रशासनाने नागरिकांना निर्बंधांमधून सूट दिली आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील शासकीय कार्यालय आता 100 टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत. त्यामुळे रखडलेली शासकीय कामे आता लवकर मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पण निर्बंधांमधून शिथिलता दिल्याने नागरिकांनी बेजबाबदारपणे वागून परत कोरोना वाढवण्यास कारणीभूत ठरू नये, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

चितळे बंधूंना 20 लाखांची खंडणी मागणाऱ्यांना क्राईम ब्रांचने अशा प्रकारे सापळा रचत केली अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांचं केलं कौतुक, म्हणाले…

मोठा निर्णय! रुग्णसंख्या घटल्यानंतर ‘या’ राज्यानं लाॅकडाऊन हटवला

काय सांगता!!! आता पुरुष देखील प्रेग्नेंट होणार?; वैज्ञानिकांचा अजब प्रयोग यशस्वी

…..म्हणून लसीकरणासाठी WHO ने भारताकडे मागितली मदत

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More