बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला विश्वचषक जिंकून देणारा खेळाडू 28 व्या वर्षीच निवृत्त, आता खेळणार ‘या’ देशाकडून!

नवी दिल्ली | भारताला 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकून देणारा 28 वर्षीय क्रिकेटपटू फलंदाज उन्मुक्त चंद याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्यासाठी त्याने भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे 2012 साली झालेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक संघाचा कर्णधार होता आणि अंतिम सामन्यात 111 धावांची नाबाद खेळी करत संघाला विश्वचषक जिंकून दिला होता.

क्रिकेट हा एक सार्वत्रिक खेळ आहे. त्याचा अर्थ बदलू शकता परंतु तुमचे ध्येय एकच असु शकते, ते म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळ करून दाखवणं. मला लाख मोलाची साथ देणाऱ्यांचे मी मनापासुुन आभार मानतो. तसेच तुमच्यासारखी माणसं माझ्याकडे आहेत याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो. आता पुढच्या वाटचालीकडे जाऊया, असं उन्मुक्त चंदने म्हटलं आहे. यासंदर्भात त्याने ट्विट केलं आहे.

उन्मुक्त चंदच्या नेेतृत्वाखाली भारताने 2012 साली 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणींमध्ये 120 सामन्यात दमदार फलंदाजी करत त्याने 41.33 च्या सरासरीने 4505 धावा टोकल्या आहे. यात सात शतक आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. रणजी खेळताना त्याने चौथ्या सामन्यात शतक केलं होतं. तसेच त्यानं आयपीेएलमध्ये 21 लढतीत 300 धावा चोपल्या आहेत. आयपीएलमध्ये ते दिल्ली डेअरडेव्हिल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब या संघांकडून खेळला होता.

अमेरिकेकडून खेळणारा पाकिस्तानी खेळाडू समी असलम त्याने उन्मुक्त चंद अमेरिकेकडून खेळणार आहे. असा 2021 सालीच पहिल्यांदा खुलासा केला होता. उन्मुक्त चंदसह स्मित पटेल आणि हरमीत सिंह हे भारतीय खेळाडू देखील अमेरिकेकडून क्रिकेट खेळणार असल्याचं समी असलम यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

शाब्बास पुणेकरांनो! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, वाचा दिलासादायक आकडेवारी

आमदार अशोक पवारांच्या ‘एक हात मदतीचा’, आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद; 28 ट्रक कोकणाकडे रवाना!

“शरद पवारांना करायचं काहीच नसतं फक्त भावल्या नाचवायच्या असतात, राहुल गांधींना लवकरच कळेल”

पुण्याच्या ‘या’ गावात महिलांना पुढचे 3 महिने गरोदर न राहण्याच्या सूचना!

राज्यपालांना परिस्थिती आणि जबाबदारीचं भान असावं – मुंबई उच्च न्यायालय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More