बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब! भारतीय खेळाडूचा अमेरिकेत धमका, अवघ्या 22 चेंडूत कुटल्या 102 धावा; पाहा व्हिडीओ

मुंबई |  भारतीय क्रिकेट संघात स्थान न मिळल्यामुळे 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार उन्मुक्त चंदने अमेरिकेकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत चालू असलेल्या टी-20 सामन्यांमध्ये उन्मुक्त चंद सध्या जोरदार फाॅर्ममध्ये खेळत आहे. उन्मुक्त चंदने एका टी-20 लीगमधील सामन्यात 22 चेंडूत तब्बल 102 धावा कुटल्या आहेत.

अमेरिकेतील मायनर लीग क्रिकेट स्पर्धेत ऑस्टिन एथलेटिक्स आणि सिल्कन व्हॅली स्ट्रायकर्स यांच्यात सामना खेळवला गेला. उन्मुक्त चंद स्ट्रायकर्स संघाचा कर्णधार आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्टिन संघानं स्ट्रायकर्स संघाला 184 धावांचं लक्ष्य दिलं. प्रत्यु्त्तरात उन्मुक्त चंदने तुफान फटकेबाजी करत 69 चेंडूत 132 धावांची वादळी खेळी साकारली आणि सामना आपल्या खिशात घातला.

132 धावांच्या या खेळीत 22 चेंडूत 15 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार ठोकत उन्मुक्त चंदने 120 धावा कुटल्या. त्यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 191.30 इतका होता. अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळताना उन्मुक्त चंदने 14 टी-20 सामन्यांमध्ये 1 शतकासह 534 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 18 षटकार आणि 52 खणखणीत चौकार खेचले आहेत.

दरम्यान, भारताने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली 2012 साली 19 वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. चंदने अंतिम सामन्यात 111 धावांची विजयी खेळी साकारली होती. बऱ्याच वर्षांपासून उन्मुक्त चंदला भारतीय संघात खेळण्याची संधी न मिळल्यामुळे त्याने अमेरिकेत खेळण्याचा निर्णय घेतला.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

अफगाणिस्तानात आता पुरूषांचेही हाल; तालिबान्यांनी घातल्या ‘या’ जाचक अटी

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रश्मी वहिनींचा बंगले घेण्यासाठी वापर केला”

‘…तर आम्ही न्याय कुणाकडे मागावा’; करूणा शर्मा प्रकरणावरून पंकजा मुंडेंची खोचक टीका

“भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला अन् मला दिल्लीत आशीर्वाद मिळाले”

‘…तर ‘त्या’ आमदारावर गुन्हा दाखल करावा’; संभाजी ब्रिगेडची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More