Unseasonal rain | गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा विदर्भामध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुपारपर्यंत अंगाची लाहीलाही होताना दिसत होती. मात्र आता पुन्हा संध्याकाळी विदर्भात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. यामुळे विदर्भात मोठं नुकसान झालं आहे. अकोला, यवतमाळ, बुलढाणा, नागपूरसह इतरत्र ठिकाणी एकच दाणादण उडाली आहे. (Unseasonal rain)
अवकाळी पावसाने घरावरील पत्रे उडून गेले
अशातच या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झाडे पडली आहेत. काही ठिकाणी विजेच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे.
एकीकडे विदर्भात उष्णतेचा पारा रोज नव्याने उच्चांक गाठत असताना मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने बळीराजा देखील अर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान यवतमाळ जिल्ह्यामध्ये 46 अंश सेल्सिअस तापमानाची विक्रमी नोंद केली आहे. पाच वर्षातले हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलं. (Unseasonal Rain)
दिवसभर यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसाने धिंगाणा घातला. तर जिल्ह्यातील महागाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळीवाऱ्याचा जोरदार फटका बसला. या घटनेमुळे काही घरांवरील पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर यात एकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली, इतर दोघे गंभीर जखमी झालेत.
25 घरांची पडझड
यवतमाळच्या आर्णी आणि महागाव तालुक्यात अचानक झालेल्या वादळीवाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. आर्णी तालुक्यात पाभळ येथील 25 घरांची पडझड झाली आहे. अनेक घरावरील टिनपत्रे उडून गेले आहेत. काही ठिकाणी स्थानिक रस्ते आणि वाहतूक बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
अकोला येथे पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच अकोल्यातील अकोट गावात अवकाळी पावसाने नुकसान केलं आहे. वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. तर अकोला जिल्ह्यातील पणज गावात एका शेतकऱ्याच्या शेतातील गोदामावरील टिनपत्रे वाऱ्यामुळे उडून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे मोठं नुकासान झालं आहे.
News Title – Unseasonal Rain Extensively Damaged In Vidharbha
महत्त्वाच्या बातम्या
राज्यातील ‘या’ भागात येत्या 24 तासात मान्सूनची हजेरी
रितेश देशमुखने उलगडलं विलासरावांचं राजकीय गणित; थेट म्हणाला..
“तू भारतीय अभिनय क्षेत्रातील महत्त्वाची अभिनेत्री”, किरण मानेंनी केलं ‘या’ अभिनेत्रीचं कौतुक
ईव्हीएम मशीन चार मिनिटांसाठी ऑफ, ‘या’ लोकसभा मतदारसंघात मोठी खळबळ
‘फेक बेबी बंप’ म्हणत दीपिकाला ट्रोल करणाऱ्यांना पती रणवीरने चांगलंच सुनावलं