मुंबई | देशात सर्वाधित तापमान यंदा विदर्भात नोंदवलं गेलं आहे. मात्र, देशातील सर्वात जास्त उष्ण भागात पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालिचा बदल पाहायला मिळत आहे. राज्यात काही भागात नागरिक वाढत्या तापमानाने त्रस्त असताना काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
पुढचे दोन दिवस लातुर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यात पुढचे दोन दिवस पाऊस हजेरी लावणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक कोसळत असणाऱ्या पावसात गहू, हरभरा, तूर भिजल्याने शेतकरी व व्यापारांचं नुकसान झालं आहे. त्याचप्रमाणे आंबा, द्राक्ष, लिंबं, भाजीपाला यांना देखील अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
थोडक्यात बातम्या-
‘राज ठाकरे चौरंगी चिरा’, शरद पवारांवरील टीकेनंतर सुरेखा पुणेकर कडाडल्या
मोठी बातमी! व्लादिमीर पुतिन ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त, लवकरच शस्त्रक्रिया होणार?
राज ठाकरेंच्या सभेनंतर इम्तियाज जलील यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची तब्येत खालावली, महत्त्वाची माहिती समोर
आनंदाची बातमी! लोकल प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Comments are closed.