बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होईल; हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

मुंबई | आजपासून पुढचे चार दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली  आहे. मार्चच्या सुरवातीलाच उन्हाचा तडाखा जाणवायला लागला होता. त्यात आता अवकाळी पाऊस येण्याच्या शक्यतेनं शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

भारतीय हवामान खात्यानं आजपासून म्हणजेच 18 ते 21 मार्च 2021 या कालावधीत मध्यम स्वरूपाचा पाऊस येण्याचा अंदाज असल्याचं सांगितलं आहे. तर काही ठिकाणी विजा आणि गारा पडण्याची शक्यताही हवामान खात्याने दर्शवली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नागपूर ,भंडारा, गोंदिया नांदेड आणि वर्धासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, कोकणात गोव्यासह, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या दिवसांत अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच महाराष्ट्रासह मध्य प्रदेशमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात तर वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18 ते 21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊसाची शक्यता आहे, असं त्यांनी म्हटलंय.

दरम्यान, अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आधीच विस्कळीत झालेली आर्थिक स्थिती. त्यात आता अवकाळी पावसामुळे शेतीवर होणारा परिणाम यामुळे शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. अनेक पिकांवर अवकाळी पावसाचा दुष्परिणाम होतो आणि हाता तोंडाशी आलेला घास मातीमोल होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःची, पिकाची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या

Tata, Mahindra च्या दोन शानदार SUV लवकरच होणार लाँच; जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ घटना

कौतुकास्पद! दोन अक्षराच्या पत्यावरुन पोलिसांनी अडीच वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

“मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात”

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More