बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या ‘या’ बड्या नेत्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा; जाणून घ्या काय आहे प्रकरण

वाशिम | बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप करत बंजारा परिषदेचे युवा जिल्हाध्यक्ष श्याम राठोड यांनी वाशिम जिल्ह्यातील मनोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची नावं घेण्यात आल्याचं कळतंय. तसेच भाजप नेत्यांवर आणि प्रसार माध्यमांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.

मनोरा पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर, भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार आशिष शेलार, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रसाद लाड यांची नावं घेण्यात आल्याची माहिती आहे.

पूजा चव्हाण या मुलीची तर बदनामी झालीच. पण तिच्या परिवाराची आणि संपूर्ण बंजारा समाजाचीही बदनामी झाली. त्या पीडितेने आत्महत्या केली की काय? याचा तपास पोलीस करत आहेत. पण भाजपच्या नेत्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जात पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकला आणि तपासात अडथळा निर्माण केला, असा आरोप श्याम राठोड यांनी केला आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेना मंत्री संजय राठोड यांना विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावानंतर अखेर राजीनामा द्यावा लागला. पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं होतं. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने लावून धरली होती. तसेच याप्रकरणावरून भाजपने सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा साक्षीदार म्हणून जबाब नोंदवा”

‘ …तर आम्ही मदत करू शकतो’; न्यायालयानं बलात्काऱ्याला विचारलेल्या प्रश्नानं सगळेच हैराण!

मी कोरोनाला कधीच घाबरलो नाही, कारण…- भगतसिंह कोश्यारी

पुण्यातील त्या पीएचडीच्या विद्यार्थ्याच्या हत्येमागचं गूढ उकललं; पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाणांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More