बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! नितेश राणे न्यायालयासमोर शरण, म्हणाले…

सिंधुदुर्ग | भाजप नेते नितेश राणे यांचा अटकपुर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयात अर्ज करण्याचे आदेश आले होते. त्यातच आता नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात तांत्रिकदृष्ट्या शरण आले आहेत.

नितेश राणे आज दुपारी वकिलांसोबत न्यायालयात हजर झाले होते. नियमित जामीनासाठी अर्ज केल्यानंतर नितेश राणेंच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकिलांनी माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणेंच्या नियमित अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

तोपर्यंत आम्ही माध्यमांसमोर कोणतही वक्तव्य करणार नाही, असं राणेंच्या वकिलांनी सांगितलं आहे. सुनावणीवेळी काय निर्णय होतोय ते पाहूनच बोलता येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. सरकारी वकिल ऑनलाईन होते. सरकार खूप काम करतं, असा खोचक टोलाही नितेश राणेंच्या वकिलांनी लगावला आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयामध्ये नितेश राणे यांच्यावतीने मुकूल रोहितगी यांनी युक्तीवाद केला होता. नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला. तर राज्य सराकारच्यावतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली होती. सर्वोच्च न्यायालयाकडून  नितेश राणेंना 10 दिवस अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. नियमित जामीनासाठी नितेश राणेंना कनिष्ठ न्यायालयात अर्ज करायचा होता.

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र ‘मास्क फ्री’ होणार का?, ठाकरे सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता

लस घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मेडिकलमध्येही मिळणार ‘या’ दोन लस

काँग्रेसला मोठं भगदाड! तब्बल 28 नगरसेवकांचा अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

‘माझ्या ब्राचे माप देव घेत आहे’; श्वेता तिवारीच्या वक्तव्यानं खळबळ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More