बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही’; पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई | मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर लगेचच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थिगिती दिली. त्यामुळे राज्यातील वातावरण सध्या खूपच तापलेलं आहे. अशातच ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप पक्षाच्या नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ठाकरे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

राज्य सरकार न्यायालयात ओबीसींची बाजू मांडू शकले नाहीत म्हणून आरक्षण गेलं आहे. त्यामुळे मंत्री असणाऱ्यांना आंदोलन करण्याची काय गरज आहे? असा सवाल करत, त्यांनी निर्णय घेण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्र्यांनी तत्काळ निर्णय करावा. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडेंनी सरकारला दिला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या.

ओबीसी आरक्षण हा केवळ भाजप पक्षाचा प्रश्न नसून, सर्व ओबीसी नेत्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही ओबीसींच्या हितासाठी काहीही करायला तयार आहोत. त्याचबोरबर आज आज भाजप पक्षानं घेतलेल्या बैठकीत येत्या 26 जून रोजी आम्ही चक्का जाम करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

मंत्र्यांबरोबरच सरकारलाही भरपूर अधिकार असतात. आमच्याकडे निर्णयक्षमता होती. त्यावेळी आम्ही हे आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी पाऊलं उचलली. परंतू आताच्या सरकारची तशी मानसिकता दिसत नसल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

थोडक्यात बातम्या-

‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न

‘…अन्यथा रस्त्यावर उतरू’; विनायक मेटेंचा सरकारला इशारा

शिवसेनेचा वर्धापन दिन कशा पद्धतीने साजरा होणार?; अनिल परब यांनी दिली माहिती

‘….तर काँग्रेस पक्ष आडवा येईल’; भाई जगताप यांचा शिवसेनेला इशारा

ज्याची भीती होती तेच झालं! भारत-न्युझीलंड अंतिम सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाचा खोळंबा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More