‘…तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये’; कृषीमंत्री दादा भुसे यांचं आवाहन
मुंबई | गेल्या आठवड्यामध्ये राज्यात मान्सून दाखल झाला आहे. मात्र, राज्याच्या काही भागांमध्येच पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस अजूनही हुलकावणी देत आहे. अनेक भागांमध्ये हंगामाची सुरूवात कोरडी झाल्याने पेरण्यांसंदर्भात शेतकरी चिंतातूर आहेत. त्यातच आता राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन केलं आहे.
कृषी विद्यापीठ शेतकरी हितासाठी आहेत. तसेच कृषी विज्ञान केंद्राचंही काम आहे. त्यामुळे शेतकरी हिताच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या केंद्रांनी काम करावं. जोपर्यंत योग्य पाऊस पडत नाही तोवर पेरणी करु नका. 70 ते 100 मीमी पाऊस पडेपर्यंत चाड्यावर मुठ ठेऊ नका, असं आवाहन दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
खरीप हंगामातील पेरणीसाठी 30 जूनपर्यंतचा कालावधी योग्य असतो. त्यामुळे या हंगामातील पिकांच्या पेरण्या लांबल्या, असं म्हणता येणार नाही. येत्या आठवडाभरात पाऊस पडल्यास त्या वेळेवर होतील, असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे. किमान 97 तर कमाल 105 टक्क्यांपर्यंत पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला असताना तसे घडले नाही, असंही दादा भुसे म्हणाले.
दरम्यान, खरीपाच्या पेरण्यांसाठी बियाणे, रासायनिक खते यासंदर्भात वेळोवेळी आढावा घेऊन नियोजन केले जात आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी विभाग काम करत आहे, असं दादा भुसेंनी म्हटलं आहे. यंदा खरीपाच्या केवळ दीड टक्का पेरण्या पुर्ण झाल्या आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
थोडक्यात बातम्या-
काय सांगता! आता व्हॉट्सअॅपवरून कर्जही काढता येणार, वाचा सविस्तर
“पंकजा मुंडेंना उमेदवारी नाकारल्याने पक्षात सर्वकाही अलबेल आहे असं भाजपने समजू नये”
अभिनेत्री केतकी चितळेला अखेर जामीन मंजूर, पण ‘या’ कारणामुळे मुक्काम तुरुंगातच
2024च्या लोकसभा निवडणुकाबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘एखाद्याच्या अंगात येतं तसं संजय राऊतांच्या अंगात आलं आणि…’, काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य
Comments are closed.