मुंबई | कोरोना संसर्गावरील कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता दिली नसल्याचे खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं आहे. ‘कोरोनिल’ औषधाला जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणिकरणानुसार आयुष मंत्रालयाने मान्यता दिल्याचा पतंजली आयुर्वेद कंपनीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील, सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषध विक्रिस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे.
पतंजलीच्या कोरोनिल औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने प्रश्न उपस्थित केले असून, जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही, असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
तसेच जागतिक आरोग्य संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषध विक्रिस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, हरिद्वार येथील पतंजली आयुर्वेद या कंपनीने तयार केलेल्या ‘कोरोनिल’ या औषधाला आयुष मंत्रालयाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमाणन योजनेनुसार प्रमाणपत्र बहाल केले होते. 19 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात घोषणा करण्यात आली होती. कोरोनावर पुराव्यानिशी सिद्ध झालेले ‘कोरोनिल’ हे पहिले औषध असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
पतंजलीच्या #Coronil औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर #IMA ने प्रश्न उपस्थित केले असून #WHO ने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणण आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणं योग्य नाही.(१/२)
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 23, 2021
#WHO, #IMA व इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या #Coronil औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही.
(२/२)— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) February 23, 2021
थोडक्यात बातम्या –
‘पोहरादेवी गडावरील गर्दीबाबत संबंधितांवर कारवाई करा’; मुख्यमंत्री ‘अॅक्शन’मोडमध्ये
“मंत्र्यांचे तरूणीसोबत फोटो प्रसिद्ध होऊनही कारवाई नाही, उद्धव ठाकरे शरद पवार गप्प का”
“वाॅर्नरला हैदराबादच्या कर्णधारपदावरुन हटवा, त्याचा फिक्सिंगमध्ये सहभाग”
“कॉलर उडवणारे आणि मिशी पिळणारे घरात बसले आहेत”
जालना जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय ‘या’ तारखेपर्यंत बंद पण…