देश

‘…तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही; शेतकरी आक्रमक

नवी दिल्ली | शेतीविषयक कायदे रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा अद्याप कायम आहे. सोमवारी उभयतांमध्ये झालेल्या चर्चेची आठवी फेरी निष्फळ ठरली.

केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि वाणिज्य राज्यमंत्री सोम प्रकाश या मंत्रिगटाने सोमवारी 40 शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी विज्ञान भवन येथे चर्चा केली. ही चर्चेची आठवी फेरी होती

कृषी कायदे रद्द न करण्याच्या निर्णयावर मंत्रिगट ठाम राहिला. दोन्हीकडच्या सदस्यांचा समावेश असलेली एक समिती नेमून या संदर्भात सन्माननीय तोडगा काढला जावा, असा पर्याय मंत्रिगटाने सुचविला. मात्र शेतकरी संघटनांनी तो धुडकावून लावला. चार तास चाललेली चर्चा निष्फळ ठरल्याने, आता 8 जानेवारीला पुन्हा एकदा बैठक घेण्याचे ठरलं आहे.

जोपर्यंत केंद्र सरकार तीनही कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत आम्ही घरी परत जाणार नाही, असं शेतकऱ्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

लसीकरणानंतर दुष्परिणाम झाल्यास उपचाराची तयारी ठेवा- उद्धव ठाकरे

जळगावातील खळबळजनक घटना; पैशाचं आमिष दाखवून 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

कोरोनाच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान; बोरिस जॉन्सन यांच्याकडून पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

सोहेल खान, त्यांचा मुलगा निर्वाण खान आणि अरबाज खानविरोधात FIR दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या