पुणे | शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून अहिल्याबाईंच्या पुतळ्याचं उद्धाटन होऊ नये. अहिल्याबाईंचं काम इतर सर्वांसाठी होतं. त्यामुळं पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं म्हणत भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे.
जेजुरी गडावरील अहिल्याबाईंचा पुतळा वर्षभरापूर्वीच तयार झाला होता. परंतू कोरोना संसर्गामुळं पुतळ्याच्या उद्धाटनाचं काम रखडलं होतं. 13 फेब्रुवारी रोजी या पुतळ्याचे उद्धाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार होतं. मात्र शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजी करत गोपिचंद पडळकरांनी पुतळ्याचं उद्धाटन मेंढपाळांच्या हस्ते केलं. त्यावेळी कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील बहुजन समाजातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार नावाच्या वाईट प्रवृत्तीने आपले हात पुतळ्याला लावू नये, असं गोपिचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे उद्धाटन झाल्यानंतर पडळकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनवरण खरंतर मागील वर्षी 16 फेब्रुवारीला होणार होतं. मात्र वर्ष सरलं तरीही या पुतळ्याचं अनावरण झालं नसल्याचंही पडळकरांनी सांगितलं.
दरम्यान, गोपिचंद पडळकरांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंदर्भात एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात अहिल्याबाईंच्या पुतळ्याचा अनावरण कार्यक्रम पुढील 15 दिवसांमध्ये करण्यात यावा, असं आवाहन केलं होतं.
थो़डक्यात बातम्या-
एक नवरा, एक प्रियकर… आणखीही अनेकांसोबत संबंध, शेवट काळजाचा थरकाप उडवणार
ती पुन्हा येतेय… जावा पुन्हा लॉन्च करतेय आपली खतरनाक बाईक!
‘हा’ आईपीओ मंगळवारी बाजारात धडकणार; गुंतवणुकदांरांसाठी मोठी संधी
अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका
राज्य सरकारचा फ्लिपकार्टसोबत करार, तुम्हालाही होऊ शकतो फायदा