राजकारणात खळबळ; झेडपी अध्यक्षाच्या मुलाचा नको तसला व्हिडीओ व्हायरल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | मधेपुरा जिल्ह्यातील मुरलीगंज नगर (Mulriganj Nagar) पंचायतीचे माजी अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्षाचा मुलगा श्वेत कमल उर्फ बौआ यादव याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला. यानंतर राजकारणात खळबळ उडालीये.

या संदर्भात मुरलीगंज नगरपंचायतीचे माजी अध्यक्ष श्वेत कमल उर्फ ​​बौआ यादव यांनी शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती.

पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, ज्याप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचा स्नेह आणि तरुणांचा माझ्यावर असलेला विश्वास आहे, त्यामुळे माझी राजकीय प्रतिमा डागाळण्याचे गंभीर षडयंत्र विरोधकांकडून रचले जात आहे.

व्हायरल व्हिडीओ बनावट असल्याचं सांगून त्यांनी हा व्हिडीओ पूर्णपणे एडिट केलेला असल्याचं सांगितलं. जो विरोधकांकडून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

त्यांनी सांगितलं की त्यांची वहिनी माजी सभापती सर्जना सिद्धी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुरलीगंज नगर पंचायतीमधून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होत्या.

निवडणुकीत त्यांचा पराभव कसा करायचा, या संदर्भात सायबर क्राइमच्या माध्यमातून विरोधकांकडून विविध प्रकारे मानसिक छळ केला जात होता. हा व्हिडीओ 26 डिसेंबरलाच व्हायरल करण्यात आला होता, मात्र विरोधकांचा डाव फसला आणि व्हिडीओ व्हायरल होऊ शकला नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-