आमच्यासोबत रात्र घालव, तुझ्या पतीला सोडून देऊ- पोलीस

बरेली | उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये पोलिसांनी एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही महिला आपल्या पतीला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेली होती.

आमच्यासोबत रात्र घालव, तुझ्या पतीला सोडून देऊ, असं पोलिसांनी म्हटलं. मात्र तिने नकार देताच पोलिसांनी आपल्याला जबरदस्ती खोलीत खेचून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, असं पीडितेचं म्हणणं आहे. 

दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधीक्षक जोगेंद्र कुमार यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या