भाजप कार्यकर्त्यांचे ‘बुरे दिन’; मंत्र्यानं साफ करुन घेतली चप्पल

लखनऊ | भाजपच्या मंत्र्याने आपल्या कार्यकर्त्याला चक्क चप्पल साफ करायला लावल्याचा प्रकार समोर आला आहे. राजेंद्र प्रताप सिंह असं या मंत्र्याचं नाव आहे. ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.

बुद्ध पीजी महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रमाला गेले असता त्यांनी आपल्या चपलेवर लागलेली माती कार्यकर्त्याकडून साफ करुन घेतली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मंत्रिमहोदयांनी आरोप फेटाळून लावला आहे. असा काहीच प्रकार घडला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. 

दरम्यान, कार्यकर्त्यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. मंत्रिमहोदयांनी स्वत:ची चप्पल स्वतः साफ केली, असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-नरेंद्र मोदीच पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत; नारायण मूर्तींची इच्छा

-अखेर रणवीर-दीपिकाचं ‘शुभमंगल सावधान’; पाहा दोघांच्या लग्नाचे फोटो

-आरक्षण द्यायचंच होतं तर बेचाळीस हुतात्मे जाण्याची वाट का पाहिली?

-माझ्याकडे तुमचा नंबर नाही… हे एेकताच सदाभाऊ खोत तहसिलदारांवर भडकले

-राहुल गांधींना मी नेता मानत नाही; काँग्रेसच्या नेत्याचा घरचा आहेर