लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत वडिलांच्या अंत्यसंस्काराला न जाण्याचा निर्णय आदित्यनाथ यांनी घेतला आहे.
योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंद सिंह बिष्ट यांनी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये आज अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या मृत्यूची बातमी समजली, तेव्हाही योगी कोरोनासंदर्भात एका महत्त्वाच्या बैठकीत होते. निरोप मिळाल्यानंतरही त्यांनी बैठक सुरुच ठेवली.
आईला भावनिक पत्र लिहित आदित्यनाथ यांनी आपला निर्णय कळवला. काही अधिकाऱ्यांनी योगी यांना वडिलांच्या अंत्यसंस्कारांना जाता यावं, यासाठी तयारी सुरु केली. मात्र त्यांनी आपण दिल्ली किंवा उत्तराखंडला जाणार नसल्याचं सांगितलंय.
आनंदसिंग बिष्ट हे बर्याच दिवसांपासून यकृताच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले, मात्र आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ट्रेंडिंग बातम्या-
पालघर हत्या प्रकरणी योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन
पालघर झुंडीकडून हत्या; योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन
महत्वाच्या बातम्या-
पालघर झुंडबळीची घटना अस्वस्थ करणारी- सुबोध भावे
‘अहंकाराने तुमच्यातील अज्ञानता वाढवू नका’; झायरा वसीमचा बबिता फोगटला टोला
टांगे भी प्रोटेक्ट हो, नहीं तो व्हायरस निचे से आ जाएगा; पाकिस्तानी मंत्र्याचं अजब वक्तव्य
Comments are closed.