Top News देश

आग्र्यातील संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव- योगी आदित्यनाथ

लखनऊ | आग्रामधे मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरु आहे. या बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचं देणार असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.

गुलीमीची मानसिकता असलेल्या प्रतिक चिन्हांचा नव्या उत्तर प्रदेशमध्ये काहीही स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक हे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये बांधल्या जाणाऱ्या संग्रहालयाला अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज याचं नाव देण्यात येणार असून हे संग्रहालय महाराजांच्या नावाने ओळखलं जाणार आहे. यासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.

दरम्यान, ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर बांधण्यात हे संग्रहालय बांधण्यात येत असून सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास या संग्रहालयाच्या माध्यमातून जगभर पोहोवण्याचा यूपी सरकारचा उद्देश आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

सावधान! भामट्यांनी पैसे लुटण्याची नवी पद्धत शोधली, पुण्यातील CA तरुणीला सव्वादोन लाखाचा चुना!

भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा कोरोनाची लागण

राज्यात आज 17 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

“विराट कोहलीनंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो भारतीय संघाचा कर्णधार”

“बॉलिवूडच्या इतिहासात कंगणाएवढं धाडस कोणालाही जमलं नाही आणि भविष्यातही कोणी करु शकणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या